STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

संकट...संधी...!

संकट...संधी...!

1 min
27.1K


केरळच्या शापाने

व्यापला आसमंत

बोला आता आपण

काय करायचं हो पंत....?


पंत म्हणे

संकटाला घाबरू नका

हीच संधी प्रगतीची

हे कधी विसरू नका....!


दोन हात संकटाशी करता

संकट पाय लावून पळून जाईल

सौख्य शांती समाधान

जीवनात पुन्हा मग वळून येईल...!


संकटाला संधी समजून

सोने त्या संधीचे होऊ दे

मोडले संसार सारे देवा

नव्याने पुन्हा त्यांना मांडू दे....!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational