संगणक-प्रीती
संगणक-प्रीती
तुझी अन् माझी प्रिती
संगणकावर जमली
दोघांची जोडी आपली
इथेच पक्की झाली
सहज लाभली प्रितीला
उभय घरी अनुमती
प्रितीच्या गाडीला
विवाहसाथ लाभली
प्रेमपूर्तीने आपण आपुले
घरकुल सजविले
कधी नाही कळले
पहिले वर्ष सरले
प्रितीच्या वेलाला आला
प्रेमसिंचने बहर
बाळ आगमन वार्तेने
सुरु चेष्टेचा कहर
संगणक भेटीने झाली
आपुली प्रेमपूर्ती
बाळा आशिर्वच देण्या
आजी-आजोबा पुढती

