STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Inspirational Others

3  

Ganesh G Shivlad

Inspirational Others

संगम

संगम

1 min
299

संथ वाहे गंगामाई,

शांत यमुने सोबती..!

दोघी भगिनी निर्मळ,

संगे गुप्त सरस्वती..!


आनंदाचा सुप्रवास,

रात्रंदिन त्या करिती..!

सुर ताल राग लय,

झुळझुळ स्वर गाती..!


युगे युगे जपी नाती,

नद्या-घाट-पाणी-माती..!

पाळ आदर्श मानवा,

आर्जवून त्या सांगती..!


धर्म, जात, वंश, लिंग,

भेद नद्या ना पाळती..!

सर्व पंथ - संप्रदाय,

रोज संगमी नहाती..!


जरी उगमी वेगळ्या,

सुखे एकत्र नांदती..!

शांत प्रयाग संगम, 

आहे जगात निश्चिती..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational