STORYMIRROR

प्रदीप माने

Tragedy

3  

प्रदीप माने

Tragedy

संघर्ष

संघर्ष

1 min
174

मातीलाही कधीतरी घडावे लागणार आहे,

पायदळी तुडवून स्वतःला, साकारावे लागणार आहे.


माझ्याही आधी उठलेला असतो वेडा सूर्य,

जणू पोटासाठी त्याला वणवण, फिरावे लागणार आहे.


लाच घेताना पाहिलंय मी आज आरशाला,

माझ्या चेहऱ्यावर त्याला हसू, आणावे लागणार आहे.


चोरून शब्दास चुंबताना पाहिलंय तुला कैकदा,

ओठांस माझ्या एकदातरी, चुंबावे लागणार आहे.


प्याला मद्याचा हातून निसटू लागला माझ्या,

शेवटच्या थेंबास परंतु, रिचवावे लागणार आहे.


काजव्यांना कुठवर सोबती बनवावे प्रकाशाचे,

उजेडासाठी कदाचित घर, पेटवावे लागणार आहे.


मी नेहमीच असतो निराळ्या भ्रमात माझ्या,

कल्पनांचे दुकान माझे, उचलावे लागणार आहे.


मी गुंतून बसतो तासनतास गर्दीत माणसांच्या,

भेटलेल्या माणसांस आता, विसरावे लागणार आहे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy