समूह पासष्टी
समूह पासष्टी
ओलांडली गौरवशाली पासष्टी
समूहाने आनंदात आज,
घेऊन रोज नवनवीन विषय
उपक्रमांच्या मालिकांचा साज.
हर एक दिवसात
दिसे वेगळ्या भावना,
एकाच विषयावर येई
खुप सुंदर अभ्यासू रचना.
सुरुवात होती झाली
नव्या नव्या उपक्रमांची,
जसे झाले जन्म
एका नव्या दिव्य जीवाची.
हसत-खेळत गेले दिवस
जसे अवखळ बालपण,
परिपक्वतेकडे झुकले समूह
पाहून ज्येष्ठ साहित्यिकांचे गुण.
आज आहे पासष्टी
करुया साजरी धूमधामाने,
अनुभवांचा खजिना घेऊन
समूह चालवून गुण्यागोविंदाने.
कोटी कोटी शुभेच्छा
समूह आयोजक समितीचे,
असेच कार्य चालत राहो
हीच प्रार्थना या कवयित्रीचे.
