||समजून घे स्वतःला||
||समजून घे स्वतःला||
उघडून बघ एकदा
अंतर्मनाची द्वारे
शोध स्वतःचे
गुण अवगुण सारे||
समजून घे,जाणून घे
तू स्वतःला
सोड निरखून पाहणे
या जगाला ||
शोध कमतरता स्वतःच्या
नको शोधत बसू चूका दुसर्याच्या ||
जागृत कर स्वतःतील आत्मशक्ती
नको लढवू इतरांची कमी
शोधण्याची युक्ती ||
सर्वप्रथम समज तू स्वतःला
सकारात्मकतेने बघ जरा
या दुनियेला ||
जाणून घे तू स्वतःला
समजून घे तू तुझ्यात असलेल्या
आदर्श मानवाला ||