समाधान
समाधान
आजवर घेतलेल्या निर्णयांना
ना आक्षेप आता माझा आहे
उमजले जसे, तेव्हा मला
मानले डोळे मिटून
जरी गेले हातचे निसटून,
ना मिळाले इच्छा असून
तरी ना खंत कशाची
आहे मी मनाने समृद्ध
तसे तर नसते कोणीही परिपूर्ण
मानावे सुख त्यात,.
जे आहे आपल्या हातात
कशाला एवढा विचार करावा
अर्थ नाही त्यात
वर्तमानात राहून
विसरावे भविष्य ,भूतकाळ
मिळेल तेवढे थोडेच असते
जे आहे त्यात सोने असते
म्हणूनच आपल्या मनाचे ऐकावे
त्यातच खरे सुख असते
