सल्ला आईचा..!
सल्ला आईचा..!
आयुष्याची रेस आहे
धावतेय न थांबता
कसं समजतं आई
मी काहीच न सांगता
थकलेय गं आता
बंध तुटला सांधता
नाही येत अगं मला
तुझ्यासारखं वागता
हुरूळून जाते कुणी
तुझ्या नावे ओळखता
ओटी भरे संस्कारांनी
मला लाभली पुर्णता
दुभंगती नाती माझी
पुन्हा पुन्हा सावरता
तुझ्या सल्ल्याने नेहमी
गोड होतसे सांगता
