सलाम सैनिक हो
सलाम सैनिक हो
स्वार्थाने भरलेल्या या निर्दयी जगात राचालस तू निस्वारथाचा पाया
संकटांचे ऊन स्वतः झेलत देशाला दिलीस तू आधाराची छाया।।
चालून येणाऱ्या शत्रूचा वार झेललास तू तुझ्या निधड्या छातीवर
आच नाही अली तुझ्यामुळे या भारताच्या
मातीवर।।
घरदार परिवार जरी आहे तुझा श्वास
भारतमातेच्या रक्षणाचा घेतलास तू ध्यास।।
केली नाही कधी तू स्वतःच्या जीवाची पर्वा
तुझ्याच या कर्तृर्वाने घेतो आम्ही एक श्वास नवा।।
एवढीच पार्थना तुला उदंड आयुष्य लाभो
कृतज्ञ असू तुझ्या ऋणात"सलाम सैनिक हो"।।
