सक्रिय शाळा
सक्रिय शाळा
शाळा असावी सक्रिय
होईल केंव्हा सक्रिय
गुरुजी असेल फिक्रीय
होईल तेंव्हा सक्रिय
गुरुजींची सृजनशीलता
आणिख असेल कल्पकता
विविध उपक्रम अमलाने
वर्ग चैतनन्याने सळसळता
एक सूरी अध्यापन
वर्ग होईल कंटाळवन
नवोपक्रमाची संजीवनी द्या
रमेल विद्यार्थ्यांचे मन
कर्तव्यात प्रामाणिकता
प्रमाणिकतेत सुबकता
सुबकता हीच मंजिल
स्वतः त्याचे कर्ता-धरता
सक्रिय शाळा प्रकल्पाने
नित्य नियमित श्रमाने
नव विद्यार्थी घडवूया
तो सळसळेल जोमाने
