सखी
सखी
तुला पाहण्याचा एक वेडा गं छंद
बंद फटीतून एक वेगळीच धुंद
काहीतरी करून नुसता बहाणा
तुला भेटता मज मिळतो नजराणा
तुझ्या कटाक्षाने होतो पुरता बेधुंद
तुझा केशसंभार महिरपी मोकळा
गालावरची खळी अन् चेहरा बोलला
सांगून गेला काही वेगळं ऋणानुबंध
डोळ्यांच्या खाणाखुणा ये गं मंदिरात
श्वास करू मोकळा तुझ्या दरबारात
भेटीतून बहरू दे हा नवा सुगन्ध
तुला भेटण्यामध्ये औरच धुंद
तुझ्या माझ्या जुळतील सप्तस्वर तारा
सुटेल हे कोडे होईल गंधित वारा
कसे काय कोण जाणे रेशीमबंध
तुला पाहण्याचा वेडा गं छंद

