सखी..
सखी..
सहचारिणी असली तरी
साथ देणारी सखी हवी..
जुळणारी नाती जुळतात
प्रेमभावनांची साक्ष हवी..
सखी शोभे खरी
सिद्धार्थास यशोधरा..
शाश्वत प्रेम तिचे
लोभास नसे थारा..
सखी लाभली भिमास
रमाई सारखी स्वाभिमानी..
ज्ञानलालसा मिळवण्या
थापी रात्रीस शेणी..
जरी भार्या होत्या आठ
सखी होती महाराणी सई..
शिवरायांच्या हृदयसिंहासनी
दरवळणारी गंधित जाई..
गुज मनीचे उकलण्या
जिवाभावाची सखी हवी..
हरते दुःख मनी साठलेले
देते जगण्या उमेद नवी..
