STORYMIRROR

Sunjay Dobade

Romance

3  

Sunjay Dobade

Romance

सखे

सखे

1 min
19K


खुणावते आहे गर्द वृक्षांची सावली

सखे बसू चल त्या आम्र तरू खाली


शीळ घालितो वारा

मोर फुलवी पिसारा

मंद वाहतो हा झरा

वसंतास आज कशी बघ लाली आली

सखे बसू चल त्या आम्र तरू खाली


पक्षी किलबिल करती

भ्रमर फुलांचा सोबती

जणू गातसे आरती

ही गोजिरी हरिणे फिरती भवताली

सखे बसू चल त्या आम्र तरू खाली


नदीकाठी हिरवळ

किती शीतल जळ

सुमनांचा परिमळ

तुझ्या देहाचा सुगंध पोहोचला आभाळी


रवि माघारी फिरला

रंग नभात विरला

बघ दिवस सरला

गल्लीगल्लीत पेटल्या दिवा नि मशाली

सखे चल अपुल्या परतुनी महाली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance