STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

सिंहाचा छावा

सिंहाचा छावा

1 min
210

छावा सिंहाचा , शूर वीरता

नसानसातून , वाहतसे

शिवरायांचे , अबोल प्रेम

अबोध , अजाण , राहतसे

जीsरं sजीsजीsजीsजीsजीs


आग्र्याहून सुटका , करताना

पेटा-यामधूनी , केला पोबारा

वेषांतर नामी , तयांनी केले

सुरक्षित ठेवले , युवराजाला

जीsरंsजीsजीsजीsजीsजीs


गनिमी काव्याने , मुघलांना

पळता भुई थोडी , लिलया राजांनी केली

पराक्रमाला , गालबोट परि

फंदफितुरीचे , कसे लागे हो?

जीsरंsजीsजीsजीsजीsजीs


बादशहाने , आदेश दिधला

धर्म सोडण्यासी , वीर संभाजीला

धुडकावुनी लावला , त्वरित तयाला

धर्म प्राणाहूनही , प्रिय मजला

जीsरंsजीsजीsजीsजीsजीs


हाल हाल करुनी , डोळे काढूनी

देई छाव्याला , मरण यातना

परी पराक्रमी , मानी संभाजी

धर्मापासून , ढळला नाही रंs

जीsरंsजीsजीsजीsजीsजीs


मृत्यूलाही जिंकले , संभाजी राजांनी

ओशाळला तिथे , साक्षात मृत्यू 

शूर वीराची , अशी शोकांतिका

आणते आजही , अश्रू नयनी

जीsरंsजीsजीsजीsजीsजीs


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract