STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Inspirational Children

4  

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Inspirational Children

सिंधुताई सपकाळ-कविता

सिंधुताई सपकाळ-कविता

1 min
509

काळ खडतर होता

सारा अंधार,अंधार 

झाला संघर्ष जगण्याचा 

झाल्या माई बेघर 


   भीक मागून जगणे 

   आले त्यांच्या वाट्याला 

   हिंडे अनवाणी पायांनी 

   खळ्गी पोटाची भरण्याला 


जीवन अनाथांचे पाहून 

गेले काळीज फाटून 

मन गेले हेलावून 

डोळे आले पाणावून 


   होते सोबतीला स्मशान 

   मयताचे पीठ सोबतीला 

   भाजे भाकर निखार्यावर 

   जगण्यास आधार पोटाला  


अनाथांच्या झाल्या माई 

जगणे जाणले अनाथांचे 

आपल्या हाताने भरे 

उदर अनाथ भिकार्यांचे 


    केले संस्कार माइने 

    तिच्या रसाळ वाणीतून 

   पोसल्या पिढ्या अनाथांच्या 

   माईच्या अनाथ आश्रमातून 


माई उत्तम विचार 

माई बुलंद आवाज 

त्यांचा शब्दांचा खजिना 

ऐके सारा समाज 


   माई वात्सल्याचा सागर 

   माई दयेचे माहेर 

   तिच्या कुशित वाढले 

  अनाथ मुलेमुली जगभर  


   माई एक विद्यापीठ 

  अनाथ उच्चविद्याविभूषित 

  होते अनमोल धन 

  त्यांची किमया ज्ञानात  


माई तुफान वादळ 

संकटात होत्या खंबीर 

नव्हता कुणाचाही आधार 

जगी जगल्या थोर 


माई जीवंत आठवण 

तिचे आदर्श विचार 

एक जीवंत प्रेरणा 

पेरा या भारत भूवर 


 सार्थकी लागले जीवन 

 त्यांचे मानव कल्याणाला 

 हजारोंची माय झाली 

त्यांनी इतिहास घडविला


सूर्य,चंद्र,तारे साक्षीला 

अमर नाव राहणार 

सिंधुताई सपकाळ दीप 

चारी दिशा उजळणार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract