सहवास
सहवास
पर्णकुटी बांधूनिया
सीता राही वनवासा
सुख मानले तयात
सहवास राघवाचा
दुःखी मनात उर्मिला
लक्ष्मणाच्या विरहाने
झुरे मनी महालात
ताटातूट नशिबाने
परदेश आकर्षण
जाती दूर कुटुंबाच्या
मिळे पैसा भरपूर
उणे मात्र सहवासा
नवयुग नारी मात्र
गाठ घट्ट मनामधे
संसाराचे सुख लाभे
भर्ताराच्या संगामधे
सहवासे नाथाचिया
फुले कांता संसारात
सुख सहवासे लाभे
आनंदाच्या कोटरात
