सहवास
सहवास
मी असेच रिचवत गेले
ते ईस्काचे नवथर प्याले
ती अजाण वेडसर रात
हृदयाचे ठोके चुकलेले
काटयातून तुडवीत वाटा
फुलातून गंध गिळलेले
जराशीही जाणीव नव्हती
भ्रमराशी नाते जुळलेले
सहवास सुगंधीत होता
आणि क्षणही मंतरलेले
मम गात्र गात्र फुललेले
क्षणएक मी बावरलेले
तू असाच जवळी आला
अधरातून रिचवी प्याला
मी अशीच विसावत गेली
तव श्वास खुणावत गेला
जणू तुलाच शोधीत होती
मम नजर भिरभिरणारी
अन् मला सुखावित गेली
तव नेत्र मला गिळणारी