सहवास हा सुखाचा
सहवास हा सुखाचा
गाढ मैत्री , सहवासातून उमलली
प्रेमाने बहरली , गप्पांतून खुलली (1)
प्रेमभरे चालता , अलगद विवाहवेदीवर
झाले नकळत , उभयता वधूवर (2)
सप्तपदी चालूनी ,उंबरठा ओलांडूनी
सख्या घरी येऊनी , भार्या प्रियदर्शिनी (3)
नितनूत सहवासे , दर्शन सवयींचे जाहले
गुणांसवे अवगुणही , कांतेने टिपले (4)
प्रेमभरे भर्ताराला , युक्तीने समजावले
कधी मुरड कधी सरळ ,तया
तिने बदलले (5)
संसाराची पन्नाशी , सुखी होय उभयतां
परमेशाला वंदन , सहवास भाग्य लाभता (6)
कधी गोड- कडू , आंबटही अनुभव
जुळवूनी घेता , सहवास सुखदायक (7)
घ्यावे जाणुनी , पतीला
गुणदोषांसकट
सहवासे घट्ट बंधने , नाते
सुखकारक (8)