शूरवीर तानाजी मालुसरे
शूरवीर तानाजी मालुसरे
धैर्य, शौर्य, अभूतपूर्व साहस
मराठा साम्राज्याचे एकनिष्ठ सेनापती पराक्रमाने ज्यांच्या मुघल झाले बेभान
शूर वीर, महापराक्रमी योद्धा
तानाजी मालुसरे
होते मराठ्यांची शान
स्वतःपेक्षा स्वराज्याला
भावनेपेक्षा कर्तव्याला
प्राधान्य देणारे
तानाजी "आधी लग्न कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे"
स्वप्न पूर्ण करण्यास शिवबांचे वीरासारखे लढले
लढता लढता तुटली ढाल
तरी घेतली नाही माघार
हाताला बांधून शाल
अडविला वार
रक्ताने शरीर झाले लाल तरी गनिमावर केला पलटवार
कोंढाण्यावर विजयपताका लावूनी शौर्य, स्वाभिमानाने
सोडले ज्यांनी प्राण
राखली स्वराज्याची शान आणि
अभिमानाने मिळवला सिंहाचा सन्मान
"गड आला पण सिंह गेला" अश्रू भरल्या नयनांनी काढले
शिवबांनी उद्गार
स्वराज्यरक्षणासाठी दिले ज्यांनी बलिदान
अश्या शूरवीर तानाजी मालुसरे यांना माझा प्रणाम