शून्य
शून्य
शून्यातूनही पहाट झाली
सहस्त्रकराच्या लालीने
शून्याचे अस्तित्व उमटले
अनंत कोटींच्या साक्षीने
जवाएवढे बीज सूक्ष्म हे
मिळता धरणी मातेस
विशालकाय वटवृक्ष बहरती
शून्याच्या या गोलात
शून्यातून हा आत्मा जन्मला
ब्रह्माण्ड बसले शुन्यात
शून्यातूनही पिंड बहरला
पिंड (पंच महाभूत) विलीनही शुन्यात
शून्याचा हा अव्यक्त पसारा
अव्यक्तातून व्यक्ततात
शून्याची ही पोकळ लीला
परिमाण नसे अनंतात
