STORYMIRROR

Pratik Kamble

Romance

3  

Pratik Kamble

Romance

शुक्राची चांदणी

शुक्राची चांदणी

1 min
15.1K


पहाटेचा सुर्य मावळताच

ती चमचम करत होती

इंद्राची अप्सरा लाजेल

अशी शुक्राची चांदणी होती १

काळे भुरे डोळे तिचे

अन मऊ गोरे गाल

चंद्राविना चांदणीचे 

झालेत बुरे हाल २

चमचम करती चांदणी

ती उंच ढगाच्या काळोखात

विचार पडतो मला आता

कसे दिसते तिला अंधारात 3

या शुक्राच्या चांदणीने आता

अप्सरेला ही लाजविले

चांदणीची चमक पाहून मी

माझे डोकेच खाजविले ४

चंद्राच्या आडोश्यात लपलेल्या

चांदणीची चमक लयभारी

तुटता तारा बनुनी ही चांदणी

करते ती सर्वांची इच्छा पूर्ण सारी ५

चंद्राच्याआड लपलेल्या चांदणीला

मला एक प्रश्न विचरायचायं

तु इतकी कशी चमकते चांदणी

तसे मला सुध्दा चमकायचायं ६


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance