शुभेच्छापर (वाढदिवस)
शुभेच्छापर (वाढदिवस)
असं म्हणतात, कि जमिनीवरील फुलं आणि
आकाशातील तारे अगणित असतात,
अर्थात ते कधीही मोजत येत नाहीत,
आयुष्याचे क्षण ही अगणित असतात,
अर्थात ते ही कधी मोजता येत नाहीत
आणि जरी मोजता येत असतील ही
तरी निघून गेलेले क्षण काही पुन्हा परतत नाहीत,
पण, येणारा प्रत्येक क्षण हा आपलाचं असतो
आणि म्हणूनच येणार्या प्रत्येक क्षणांत मनमोकळे
पणानं जितकं सुंदर जगता येईल तितकं जगावं
आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण हा सुंदर रीतीने
जगण्यासाठी आयुष्य ही वाढायला हवचं शिवाय
तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण
हा तुमच्यासाठी सुख - समृद्धी,
समाधान आणि आनंद घेवून येवो या सदिच्छा...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
