आयुष्याचं गणित
आयुष्याचं गणित
आयुष्य म्हणजे काय?
हे थोडक्यात सांगायचयं मला
आयुष्याचं गणित मांडायचयं मला
आयुष्यात दु:खाच्या
काट्यातुनही चालायचयं मला
दु:खाच्या काट्यातुन चालताना
सुखाच्या फुलांना ही
आनंदाने वेचायचयं मला
सुखाची ही फुलं
आनंदाने वेचताना
त्यातील दरवळणारा सुगंध
चोहिकडे पसरवायचायं मला
आयुष्य म्हणजे काय?
ते थोडक्यात सांगायचयं मला
आयुष्याचं गणित हे मांडायचयं मला
आयुष्यात प्रत्येक नाती आणि
अगणित प्रेम कमवायचयं मला
आणि प्रत्येक नात्याला
प्रेम,जिव्हाळा आणि
आपुलकीने जपायचयं मला
आयुष्य म्हणजे काय...?
हे थोडक्यात सांगायचयं मला...
आयुष्याचं हे साधं - सरळ
गणित हे असचं मांडायचयं मला...
आयुुष्याच्या सरतेशेवटी
श्वासही गमवायचायं मला
श्वासासंगे प्राणाला ही
निवांतपणे मुकायचयं मला
प्राणाला मुकतानाही
उरातल्या आठवणींना
उजाळा द्यायचायं मला
उजळणार्या गोड आठवणींमुळे
चेहर्यावर येणार्या स्मितहास्यासह
निश्चिंत मनाने आयुष्याचा
शेवटचा श्वास घेऊन
जगाचा आणि सगळ्यांचा
निरोप अगदी आनंदाने आणि
सहखुशीने घ्यायचायं मला
जाता - जाता आयुष्य म्हणजे काय?
हे थोडक्यात सांगायचयं मला
आयुष्याचं हे साधं - सरळ गणित
हे असचं मांडायचयं मला
