शतक पुर्ती विजयाची..!
शतक पुर्ती विजयाची..!
शतक पुर्ती विजयाची...!
श्रम चिकाटी सातत्य संकल्प
कोणताच ठेवला नाही विकल्प
मुंबई इंडियन्सने पूर्ण केला
विजयाचा शतक पुर्ती संकल्प...
इतिहास रचला जिद्द चिकाटी
सदैव राखून मनी
जे जे म्हणतात मनी मनी मनोमनी
त्यांच्या तोंडचे पळविले पाणी...
महाराष्ट्राची शान राखली
या नवयुवकांनी राखून मान
खरोखर विजय पाहून
प्रत्येकाच्या हृदयी येते जान...
आदर्श खेळातून चला घेऊया
जीवनात जिद्द चिकाटी बाळगण्याचा
एकदाच करू संकल्प पुन्हा
जीवनात आळस झटकण्याचा....
वा वीरांनो कौतुक तुमचे
करावे तेवढे थोडेच आहे
असेच घुमू देत चौफेर ब्रम्हांडी
विजयाचे सदैव सनई चौघडे.....!
