शृंगार मनाचा (मुक्तछंद)
शृंगार मनाचा (मुक्तछंद)
बाह्य सौंदर्याने देह सजला
कौतुकाने मी दर्पण पाहिला
माझ्याकडे पाहून तो कुत्सित हसला
माझ्या मनाला वेदना झाल्या...
का हसला मला पाहून दर्पण?
विचार केला शांत मनाने
गवसले मला माझेच उत्तर
नको हा देहाचा बाह्य शृंगार
ठणकावून सांगीतले माझ्या मना....
मनातील जळमटे केले दूर
केला सुविचारांने मनाचा शृंगार
बुद्धीचा गंज साफ केला
मदतीसाठी हात तयार झाला...
वृद्धांसाठी माया अपार
प्रेम,नम्रता,आपुलकीची बीज
मनाचा मोठेपणा दाखवी साज
भक्तीने केला तेथे निवास...
प्रेमाच्या पायघड्या मनात
स्वामीची मूर्ती हृदय कोंदणात
दीप अंतरीचा पेटविला
पुष्प सुमनांचा वर्षाव केला....
कर जोडून गुरू स्मरण केले
मनाचा शृंगार पूर्ण झाला
दर्पण पाहताच आनंदून गेला
खऱ्या अर्थाने मनाचा शृंगार झाला....
