श्रमाचे महत्व
श्रमाचे महत्व
श्रम शारीरिक असो वा मानसिक
श्रमाला दुसरा पर्याय नाही
जीवन हे उतम जगण्या
श्रमाशिवाय दुसरा विकल्प नाही
गरीबी हा काही कलंक नाही
श्रीमंती काही विभूषण नाही
जो करतो श्रम जीव ओतून
उद्धार झाल्याशिवाय रहात नाही
श्रम असो हे कुठलेही
कमीपणा त्यात नको
चालते ज्यामुळे तुमची जीविका
अपमान त्याचा व्हायला नको
श्रमाने होते शरीर धष्टपुष्ट
बुद्धीचा होतो आपल्या विकास
सकारात्मक विचार येती मनी
जीवनाचा होतो सर्वांगीण विकास
जीवन सत्कर्मी लागाया
श्रम आहे महत्वपूर्ण
परोपकार असावे जीवनाचे ध्येय
श्रमाचा वाटा गौरवपूर्ण
