श्रीमंतांच्या बाजारात
श्रीमंतांच्या बाजारात
श्रीमंतांच्या बाजारात
गरीबी विकले गेले
भाकरीच्या तुकड्या पाई
काबाड कष्ट केले.......
उच्च-नीच जात-पात
भेद काही सुटेना
गरिबांची भूक काही
कर्जा शिवाय मिटेना.......
घर-दार , जमीन सारं काही
सावकाराकडे गिरवी
आयुष्य जातं हो कर्ज फेडण्यात
पूर्वजांचे जमीनी कोण सोडवी.......
पापी पोटासाठी तो
कर्ज बाजरी झाला
अज्ञानी गरीबाला फसवून
सावकार सारं हिरावून नेला......
शेवटी काहीच उरले नाही
तेव्हा उर बडवून आकांत केला
कुटुंबाचे हाल न बघवता
झाडाला टांगून गेला......
श्रीमंतांच्या बाजारात
गरीबांचे झाले हाल
कुणी बनतील का हो ?
अशा कुटुंबीयाचे ढाल......
नुसते आश्वासने आणि
फूशारक्यांचे बोल
कळेल का हो कुणा ?
गरीब जनतेचे मोल.....
