STORYMIRROR

Sangita Pawar

Inspirational

3  

Sangita Pawar

Inspirational

श्री संत निवृत्तीनाथ महाराज

श्री संत निवृत्तीनाथ महाराज

1 min
623

सांप्रदायातील नाथ

 

असे माघ वद्य प्रतिपदेला

निवृत्तीनाथांचा जन्म झाला

गुहेत भेटले गुरु गहिनीनाथ 

नाथांना त्यांनीच योग शिकविला ||


नाथ संप्रदायातील असे

गहिनीनाथ त्यांचे गुरु

गुरूकडूनी घेऊनी दीक्षा

अभंग, हरिपाठ, रचना सुरू||


पोरक्या झालेल्या भावंडांना

नाथांनीच सांभाळ केला

मार्गदर्शक, गुरुही होऊनी

योग्य असा मार्ग दाखविला ||


आपल्या अभंगरचनेद्वारा

केली पंढरपूरची वारी

समाज प्रबोधन करूनी

नाथ चंद्रभागेच्या तीरी ||


ज्येष्ठ वद्य द्वादशी असा

त्र्यंबकेश्वरी समाधी घेती

साजरा संजीवन सोहळा

वारकरी भक्तीत न्हाती ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational