Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

श्री प्रभू रामचंद्र

श्री प्रभू रामचंद्र

1 min
270


शुक्ल पक्ष नवमी चैत्र मास,

जन्मले श्री राम कौशल्याच्या पोटी.

घेऊन सातवा विष्णूचा अवतार

करण्यास उद्धार, जण कल्याणासाठी./१/


उत्साहात करू या, साजरी राम नवमी .

गुणगान आठवून राम नाम मंत्र जपुनी.

आनंदात रममाणी, देई दुसर्‍यास आनंद.

लोकराम' प्रभू रामचंद्र, सूर्यवंशात जन्मूनी/२/


आज्ञाधारी, बंधूप्रेमी, राजधर्मी ,एकपत्नी वृत्ती

धर्म ,अर्थ व काम,जाणी तिन्ही पुरुषार्थ.

मर्यादापुरुषोत्तम श्रीराम, विष्णू अवतार रघुपती

ऋषी मुनींच्या सानिध्यात घडे रामास परमार्थ./३/


राम-सीता-लक्ष्मण वचनपूर्ती करण्यास,

भोगे चौदा वर्षांचा अनपेक्षित वनवास.

अभयदान देऊन ऋषींना संहार करी नरभक्षकांस.

पंचवटीत राहुनी, अनुभवी ऋषीमुनींचा सहवास./४/


रावण वधाने दिला युद्ध विराम,

क्षत्रिय वृत्तीने केले सीतेस मुक्त. 

प्रजा शंकेने पीडा होई रामास 

त्यागुनी सीतेस झाले श्रीराम विभक्त./८/


वाल्मिकी लिखित महाकाव्य रामायण 

लव कुश स्वयं मुखातून प्रचार करीत. 

माता सीता करी प्रवेश पृथ्वीच्या उदरात 

देह त्यागुनी श्रीराम विलीन होई विष्णूत./९/


Rate this content
Log in