STORYMIRROR

Prashant Shinde

Fantasy

2  

Prashant Shinde

Fantasy

श्री महालक्ष्मी...!

श्री महालक्ष्मी...!

1 min
14.6K


रूप मनोहर आई तुझे

पाहता मन माझे भरून आले

गोड मुखकमलाची शोभा पाहून

नयन तृप्त झाले


हिरव्या रंगाची साडी चोळी

सौन्दर्यात तुझ्या भर घाली

डोईवरचा गजरा गोल ग

खुलवितो बघ हसू गाली


साज शृंगार शोभिवंत

रूढी परंपरेगत भारदस्त

मान तुला ग त्रिभुवनीं

आहेच खरोखर जबरदस्त


माय माऊली तू सर्वांची

उभी आम्हासाठी कोल्हापुरी

म्हणून आई रोज खातो आम्ही

तुझ्या कृपेची ग पुरण पोळी


आशीर्वाद तुझा अंबे

राहू दे ग शिरावरी

असुदे कृपा आई

सदैव आमच्या पाठीवरी....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy