STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

श्री महालक्ष्मी सुवर्ण पालखी

श्री महालक्ष्मी सुवर्ण पालखी

1 min
27.2K


श्री महालक्ष्मी ची स्वारी आली

सुवर्णा च्या पालखीतून

आभा फाकली तव तेजाची

पहा भक्त हो डोळे भरून...!


लहान थोर कर कमलांचे

प्रयत्न झाले महालक्ष्मीच्या प्रेमातून

सुवर्ण क्षण आला जीवनी

संकल्प पूर्ती होता कोल्हापुरातून...!


आशीर्वाद दे आई आता

तुझ्या प्रेमळ भक्तांना

शोभा येऊ दे तुझ्या दर्शने

भक्तजनांच्या जीवनाला...!


सुवर्ण मंडीत पालखी तुझं केली

नगर प्रदक्षिणा करण्याला

विराजमान होई आंबे आता

क्षेम कुशल नगरजनांचे पाहण्याला...!


सुमंगल रूप तुझे पाहू दे आम्हा

विराजमान होता तू पालखीत

कृपा आम्हावरी सदा राहू दे आई

क्षमा करुनि घे भक्तजना तव उदरात...!


सेवा तव लेकरांची भोळी भाबडी

गोड मानून गे आई या मधुर कवनी

प्रसन्न होऊन आशीर्वाद दे सर्वांना

विराजमान होउनी सुवर्ण पालखीतल्या आसनी....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational