श्री गुरूस्मरण
श्री गुरूस्मरण
होतो क्षणाक्षणाला भास
मनी आहे एक आस
जीवा लागली ओढ
श्रीदत्तगुरूंच्या दर्शनाचा ध्यास
त्रिमूर्तीचे हसरे वदन
पाणीदार डोळे
नयनरम्य रुप बघून
गाती भजन भक्त भोळे
काखेत भगवी झोळी
आवडते त्यांना पुरणपोळी
मागे त्यांच्या कामधेनू
हातात त्रिशूळ डमरू
सांभाळा गुरूवर मोहमायेत
भटकत आहे तुझे लेकरू
दिसतो मला पायी खडावा
क्षणात दर्शनाचा योग घडावा
लावत तुला भाळी
केशरी टिळा
नकळत दिगंबरा दिगंबरा
गातो मी कितीतरी वेळा
एक वेळ ऐक ना देवा
आर्त हाक माझी
चरणांवर वाहते
सुगंध सुमने ताजी
