श्रावण सरी
श्रावण सरी
श्रावण सरी,
बरसल्या अंगणी,
मन वेडे मोहित होई,
त्या टपोऱ्या थेंबांवरी...
श्रावण सरी,
फुले धरतीची नवलाई,
हिरवेगार शालू लेवून,
दिसे जणू नवरी...
श्रावण सरी,
उमले नवीन पालवी,
टवटवणाऱ्या पानांनी,
होई हर्ष या उरी...
श्रावण सरी,
बरसल्या अंगणी,
मन वेडे मोहित होई,
त्या टपोऱ्या थेंबांवरी...
श्रावण सरी,
फुले धरतीची नवलाई,
हिरवेगार शालू लेवून,
दिसे जणू नवरी...
श्रावण सरी,
उमले नवीन पालवी,
टवटवणाऱ्या पानांनी,
होई हर्ष या उरी...