शपथविधी
शपथविधी
इकडून तिकडे गेले नाथा!
सत्तापालट होईल आता!!
उगाच कोश्यारी बापूना!
करोना लागण का हो करता!!
मतलबी प्रेम अचानक
ते उफळी!
जनता जनार्दन झाली
बावळी!!
नकोच ती
नौटंकी आता!
उगाच वर्षा
खाली करता!!
कमळातून तो
बाण उमले!
करा ती घाई
पहाटे पहाटे!!
बापूना करूया
करोनामुक्त गडे!
नकोच सुरत,
नको गुवाहाटी!
बरीच ती
आपली मुंबई!!
किती जनतेचा
छळ करता,
आम्हा झाली
शपथविधीची
घाई!!!
