शोधती पळवाटा...
शोधती पळवाटा...
राष्ट्र कशी होती भ्रष्ट...
लिहित आहे घेऊन थोडे कष्ट...
नवीन धोरणे, नवीन कायदे
अमलात आणताना येतात वांदे...
कुठले नियम, कुठली नीती,
जो तो आपल्या परेने खातो माती...
सगळ्याचाच असतो खाऊचा वाटा...
वेळ आल्यास दुसऱ्याचा ही काढे काटा
गरज पडल्यास कोणाचेही तळवे चाटा,
आरोप प्रत्यारोपाचा खेळ चाले खोटा,
अंगावर येताच "शोधी पळवाटा..."
देव लिहित असतात,
तुमच्या पाप पुण्याचा लखोटा...
