STORYMIRROR

Shila Ambhure

Children

2  

Shila Ambhure

Children

सहलीची मजा

सहलीची मजा

1 min
3.3K


हरेराम नगरची

आमची शाळा,

सहलीला जाया

सारी मुले गोळा.


जेवणाचा डबा

आईने भरला,

बिस्किटाचा पुडा

आजीने हो दिला.


पिशवी घेऊन

गाडीत बसलो,

बसता क्षणीच

घोरत झोपलो.


कळले ना मला

पोहचलो कधी,

उतरलो मात्र

सगळ्यांच्या आधी.


ओढ्याच्या पाण्यात

चालायला गेलो,

घसरून पाय

धपकन पडलो.


पारंब्यांचा केला

छान छान झोका,

तिथेच पाहिला

एक मोठा बोका.


फिरून पळून

खुप मी थकलो,

बाईंच्या कुशीत

हळूच शिरलो.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children