सहल जीवनाची
सहल जीवनाची
जीवन एक सहलच आहे
तिकीट आयतेच काढलेले
विधात्याने सीटवर बसवलेले
प्रवास सुरु होतो रम्य बालपणातून
कौतुक, हास्य विनोद, बाललीलातून
कुणी चांदीचा चमचा घेऊन येतं
तर कुणी अनाथाश्रमात पडतं
प्राक्तनानुसार ललाटलेख
वाचता येत नाही कुणालाच थेट
शैशव सरतं मस्ती मजेत
यौवनाची स्वप्ने खुणावती थेट
कुणी जीवाभावाचे गाठ बांधी
सप्तपदी चालून माप ओलांडी
मध्यमवयात वेळ नसतो कुणालाच
पुढे पुढे चालण्यात सर्वांचीच दमछाक
प्रौढ वयात निवृत्तीनंतर निवांत
इकडे तिकडे बघण्यात मन होई शांत
मित्र प्रभातफेरी चेष्टा विनोद बहर
जिवाभावाच्या मित्रांचा पत्त्यांचा फड
पैलतीर दिसताच सिग्नल दिसू लागे
गाडी थांबताच कोणी उतरु लागे
मनात भितीची घंटा वाजत राही
सगळ्यांचीच ही गत मित्र बजावी
अशी ही जीवन सहल कॅलिडोस्कोपने बघावी
आनंदी घटनांची पुन्हा मजा चाखावी
स्टेशन कधीतरी येणारच आहे
तोपर्यंत मी सहलीत रमणारच आहे
