STORYMIRROR

rajashree Wani

Inspirational

3  

rajashree Wani

Inspirational

शिवरायांची प्रेरणा

शिवरायांची प्रेरणा

1 min
162

 करितो वंदन 

 आम्ही शिवरायांचे भक्त

 आदर्श फक्त

 शिवराय..


 सिंहाचा छावा

 आमचे छत्रपती शिवराय

 वंदनीय माय

 जिजाऊ ..


 घेतला वसा

आम्ही जगू स्वाभिमानाने

कधीना लाचारीने 

शिवभक्त..


 समाजात करू 

 हृदयपुर्वक स्रियांचा सन्मान 

 नाही अपमान

 निरंतर..


जातीवाद भेदभाव

मुळीच नाही करणार

जनता मरणार 

उपवाशी..


पावन खिंड

शौर्याने शिवबाने लढविली

किल्ले वाढविली

विजयाने..


झेंडा रोविला 

हिंदवी स्वराज्य स्थापिले

मावळे जमविले

प्राणप्रिय..


बळीराजा प्रजेस

सुखाचे दिन आणिले

पाणी पाजिले

शत्रूस..


मातीवर जनतेवर

प्रेम केले तिन्हीसांजा 

विश्वासू राजा

शिवराय ..


नीतीमूल्य शिस्तप्रिय

तेजपुंज मावळा शिवनेरीचा

पुत्र जिजाईचा

शिवबा..


रयतेचा वाली

बनला लोकप्रिय राजा

जाणता राजा

शिवछत्रपती..


सोनियाचा दिन 

जयंतीस त्रिवार वंदन

विनम्र अभिवादन

महाराजांना..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational