STORYMIRROR

Chandan Pawar

Inspirational

4  

Chandan Pawar

Inspirational

शिवराय तुम्ही नसता तर...

शिवराय तुम्ही नसता तर...

1 min
275

शिवराय तुम्ही नसता तर 

नसता झाला शंभूछावा..

शिवराय तुम्ही नसता तर 

नसता स्वराज्य ठेवा..


शिवराय तुम्ही नसता तर 

नसते लढले मावळे..

शिवराय तुम्ही नसता तर 

नसते झाले विजयाचे सोहळे..


शिवराय तुम्ही नसता तर 

नसता झाला अन्यायाला प्रतिकार..

शिवराय तुम्ही नसता तर 

नसता झाला बळीराजाचा उद्धार..


शिवराय तुम्ही नसता तर 

नसता घुमला हर हर महादेवाचा गजर..

शिवराय तुम्ही नसता तर 

नसता झाला सह्याद्रीतून स्वराज्यजागर..


शिवराय तुम्ही नसता तर

नसता उतरला औरंगजेबाचा माज..

शिवराय तुम्ही नसता तर

नसता ठावा गनिमी काव्याच्या साज..


शिवराय तुम्ही नसता तर 

नसती आली भगवी लाट..

शिवराय तुम्ही नसता तर 

नसती उगवली स्वराज्याची पहाट..


शिवराय तुम्ही नसता तर 

नसती अवतरली शिवशाही..

शिवराय तुम्ही नसता तर 

नसती रुजली आजची लोकशाही..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational