STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

शिवराज्याभिषेक

शिवराज्याभिषेक

1 min
262

आमंत्रित करून ब्राह्मण 

देशातील कानाकोपर्‍यातून, 

उपस्थित सोहळ्याला सगळे 

प्रतिष्ठित जनता देशविदेशातून..!!१!!


करून नमस्कार जिजा मातेस

महाराज गेले गढून धार्मिक विधीत, 

देई प्रजा आशीर्वाद जय जयकारातून

पूजा अर्चना होई शिव संस्कारित..!!२!!


अर्पण करून सोन्याची छत्री 

भवानी देवीचे दर्शन घेत, 

दान, दक्षिणा, तुला, करून 

राज्यभिषेकास सज्ज होत..!!३!!


दिवस राज्याभिषेकाचा उजाडला 

मंत्रोच्चाराने, कुलदेवतेला स्मरुन,

शुभ्र वस्त्र, फुलांच्या माळा 

पूर्ण विधीवत अभिषेक छत्र धरून..!!४!! 


सोन्याचा सिंहासन शोभून दिसे 

ओवाळून सुवासनी पंचारतीने,

गागाभट्ट पवित्र अभिषेक करे 

प्रधान सप्त नद्यांच्या जलकुंभाने..!!५!!


पूजा करून अस्त्र शस्त्रांची 

आरुढ महाराज सिंहासनावर,

'शिवराज की जय' आशीर्वादाने 

दुमदुमले गड आसमंतावर..!!६!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational