STORYMIRROR

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Inspirational Others

4  

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Inspirational Others

शिवप्रताप

शिवप्रताप

1 min
236

एका विराचा जन्म झाला

रक्ताच्या अभिषेकाने स्वराज्य रचला

तलवारीच्या धारेने इतिहास चमकवला

मराठ्यांचा मावळा कधी नाय खचला

म्हणून जुलमी सत्तांचा डाव फसला

माझा शिवराय भवानी रूपाने धावला

म्हणून म्हणतो इतिहासाचा नाद नाय करायचा,

एका योद्धाचा जन्म झाला

मराठा मुलुख वाढली

बडी बेगमला धास्ती भरली

अफजखानाला इशारत सोडली

उंच धिप्पाड अफजल धाऊन आला

'मै लाऊंगा शिवा को,

सह्याद्रीच्या सिंहाला मारण्याचा कावा केला

राजाने कोथळाच रक्तबंबाळ केला

माझा शिवराय कृष्णाच्या रूपाने धावला

म्हणून म्हणतो इतिहासाचा नाद नाय करायचा,

एका शूरवीराचा जन्म झाला

महली शाहिस्थेखान शांत निद्रेत

पुणे उध्वस्त करून बसलेला

शिवरायांच्या गनिमीने बोटे गमावून बसला

शाहिस्थेखान थरथर कापला

पुणे सोडून हद्दपार झाला

माझा शिवराय रामाच्या रूपाने धावला

म्हणून म्हणतो इतिहासाचा नाद नाय करायचा,

एका राजाचा जन्म झाला

स्वराज्य घडी बसली

चनचन पैशांची सुरू झाली

सुरतेवर हल्ला करून

सुरत बेसुरत केली

इंग्रज डच पोर्तुगीज मुघल हादरली

माझा शिवराय दैवत रूपाने धावला

म्हणून म्हणतो इतिहासाचा नाद नाय करायचा,

एका सूर्याचा जन्म झाला

हो आमच्या शिवबाचा जन्म झाला

पिंजून काढली मोगलाई

भादरून काढली आदिलशाही

दिल्लीचा औरंगजेब थरथर कापला

माझा शिवराय विट्ठल रूपाने धावला

म्हणून म्हणतो इतिहासाचा नाद नाय करायचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational