शिल्पकार
शिल्पकार


शिल्पकार तू साऱ्यांचा
कसे फेडावे उपकार तूझे
घडविलास गोळा मातीचा
आकारलेस तू शिल्प माझे
प्रसंगी झालात कठोर तुम्ही
भरला रागे अधिकाराने
शिस्तीचे देवून धडे तुम्ही
शिकविले वागणे न्यायाने
दाखविला रस्ता लागली ठेच जरी
मार्गदर्शक होऊनी जपली नाती
घडविल्या निर्व्याज मूर्ती किती
नसे त्यांना कसलीच गिनती