शिक्षणाचे योगदान
शिक्षणाचे योगदान


शिक्षणाचे दार खुले केले
फुले दांपत्याने
अगणित हाल सोसले
स्त्री शिक्षणाच्या ध्यासाने (1)
स्वतः शिकूनी, शहाणे होऊनी
घर शहाणे केले
एका स्त्रीच्या शिक्षणाने
घर सुशिक्षित झाले (2)
प्रगतीचा पथ सापडला
मागे ना वळली
कर्तृत्वशिखरे गाठता
अत्युच्च पदी पोचली (3)
सर्व क्षेत्रे पादाक्रांत करुनी
ना कुठेच मागे
सैन्यातही भरती होऊनी
देशरक्षणा पुढे (4)
बुद्धीच्या जोरावर तिने
समता सिद्ध केली
मुलगी शिकली म्हणूनी
स्त्री सरस ठरली (5)