शिक्षणाचे गाणे-गीत
शिक्षणाचे गाणे-गीत
शिक्षणात नवीन बदल केला
नियमांच्या पिंजऱ्यात बंदिस्त झाला
विद्यार्थ्याला छडी कधी मारायची नाही
नवीन कृती, कौशल्य ,अध्यापन पद्धत शिकवायची
कितीही गोंधळ घातला तरी बोलायचे नाही
अभ्यास केला नाही म्हणून ओरडायचे नाही
काही येत नाही म्हणून हिणवायचे नाही
वर्गात त्याला कधी अपमानित करायचे नाही
वर्गात दंगामस्ती केली म्हणून मारायचे नाही
वर्गाच्या बाहेर उभे कधीही करायचे नाही
सर्व काही त्याला समजून सांगायचे
ऐकले नाहीतर जाब विचारायचा नाही
अशा विद्यार्थ्यांवर कधी रागवायचे नाही
का लिहिले नाही म्हणून दबाव आणायचा नाही
सर्वकाही आता आपण निमुटपणे पहायचे
त्यांच्यासाठी कायद्याचे पालन करायचे
नापास होण्याची भीती आता संपली
अभ्यास चुकारांची दहशत वाढली
अभ्यास न करताही पोरे होतात पास
हुशार विद्यार्थांवर अन्याय होतो हमखास
शिक्षणाची मूल्ये तो शिकतच नाही
शिस्त, संस्कार संयम मानतच नाही
शिक्षण नको त्याला खेळायचाच नाद
मैदानावर नेण्यासाठी घालतात वाद
शिक्षण झाले टाइमपास, इच्छा त्यांची संपली
शिक्षणाने त्यांची कोणती प्रगती साधली?
दंगामस्ती,डान्स, गाणी हेच त्यांचे ध्येय असते
चिंतन, मनन, पाठांतर त्यांना नकोसे वाटते
शिक्षणाचे खच्चीकरण हाच आहे का डाव
निकृष्ट अभ्यासक्रम घालतो त्याच्यावर घाव
शिक्षण खात्याचेही आता नियम झाले कठोर
कायद्याची अंमलबजावणी करतात काटेकोर
