शिक्षण
शिक्षण
एकदा अभ्यासाचा
छंद लागला की
कोणतेही व्यंग
आडवे येत नाही
कोणत्याही संकटाचा
त्रास वाटत नाही
प्रतिकूल परिस्थितीत
देखील व्यक्ती अभ्यास
केल्याशिवाय राहत नाही
बहुतांश वेळा
परिस्थिती माणसाला
खूप काही ज्ञान
देऊन जाते
पैशाने ज्ञान विकत
घेता आले असते
तर आज कोणताच
गरीब विद्यार्थी
मोठ्या पदापर्यंत
पोहोचले नसते
आतापर्यंतचा इतिहास
आपणाला सांगतो आहे
गरिबीने अनेकांना शिक्षण
घेण्यास मजबूर केले आहे.
