STORYMIRROR

Sujata Puri

Inspirational

3  

Sujata Puri

Inspirational

शिक्षक दिन

शिक्षक दिन

1 min
262

कुंभार देई आकार

ओल्या कच्च्या मातीला

गुरु तसाच घडवतो

अबोध लेकराच्या जातीला.


अज्ञानाला दूर सारून

ज्ञानाचा दिप लावतो

काळोख्या वाटेवर चालून

विद्यार्थ्यांना मार्ग दावतो.


निरागस मनाच्या मुलांना

खरा माणूस बनवतो

शिक्षक हाच खरा

संस्कृति रक्षक जाणवतो.


पंखांना बळ देऊन

शिल्पाला देतो आकार

अपार मेहनत घेऊन

स्वप्नांना करतो साकार.


साफल्य देई जीवनाला

ज्ञानाचा खळाळता झरा

देई जीवन सन्मानाचे

दीपस्तंभ हाच खरा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational