शिक्षिका
शिक्षिका
समाजाचे खरे स्तंभ
ज्ञानज्योती पेटवणे,
नागरिक घडविण्या
माझे कार्य शिकविणे..!!१!!
लावे चांगल्या सवयी
देई विद्यार्थ्यांना धडे,
रोज शिकविते मुल्ये
त्यातूनच मुले घडे..!!२!!
देते उत्तरे सर्वांना
समाधान होइस्तर,
म्हणूनच आदराने
सर्व म्हणत मास्तर..!!३!!
इंग्रजीच्या विषयाचे
सोपे वाटे त्यांना ज्ञान,
मुले आवडीने शिके
शिकताना सोडी भान..!!४!!
अनोळख्या शब्दातले
आपलेसे शब्द करे,
सोप्या भाषेत सांगता
प्रश्न बरेच विचारे..!!५!!
उत्तरांना तोंड देता
कार्यातून वेळ जाई,
छंद मलाही जडला
नव्या शब्दांना जुळवी..!!६!!
