शीर्षक कोटी कोटींची भारतमाता
शीर्षक कोटी कोटींची भारतमाता


कोटी कोटी बालकांची
आहे मी भारतमाता
विविधतेमधूनही
नांदते येथे एकता (1)
शृंखलाच होत्या पायी
बेड्या परक्या सत्तेच्या
वीर झुंजले बेभान
मला स्वतंत्र करण्या (2)
हर्ष स्वातंत्र्यप्राप्तीचा
झाला खूप मनातूनी
प्रगतीचा वाहे वारा
भरे ऊर अभिमानी (3)
चित्र आगळेच दिसे
कन्या असती पिडीत
चाड नसे नराधमा
तिज बळेच जाळीत (4)
मज हवे भारतीय
सुखी अन् समाधानी
नको कुणाचा आक्रोश
नको स्त्रीची मानहानी (5)
असा भारत मजला
कधी मिळे बघण्यास?
माता सांगे झटण्यास
मम मनी हीच आस (6)