शीर्षक भावनांचे जाळे
शीर्षक भावनांचे जाळे
भावनांचे घट्ट जाळे
मनी मानवाच्या असे
कधी उद्रेक तयाचा
कधी मनी दाबतसे (1)
सुख दुःख जीवनात
बदलत्या फे-यापरि
कधी अश्रूपात तर
कधी आनंदाश्रू सरी (2)
सूड , असूया ,मत्सर
मना असती पदर
फणा काढती वेगाने
शत्रू पाहूनी सत्वर (3)
स्नेह , लोभ , दया ,माया
मना देती नित्य शांती
पुण्य वेचूनी जीवनी
यश , आशिर्वचन घेती (4)
भावनांचा गोफ मनी
सदा झुलतचि असे
राग- लोभ त्रिज्येवरी
मनू क्रोध जिंकतसे (5)
भावनांची झूल कुणी
पाठीवर टाकतसे
कर्तव्याचा धनू हाती
प्रयत्नाने जिंकतसे (6)