STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Tragedy Action Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Tragedy Action Inspirational

शहराकडे लोकं निघाली

शहराकडे लोकं निघाली

1 min
273

आई माझी रुखमाई

विठुराया बाप झाला

पोर -सोर, गुरं- ढोर

शेत माझे पंढरी


बख्खळ पिकायचं पण

कवडीमोल विकायचं

घरात अठराविश्वे दारिद्रय

पण माणसं समाधानी असायची


कर्जाचा डोंगर माथ्यावर

लगीन सराईलाही खर्च

शिक्षण दुखणं भान

वरतून अचानकच बरंच काही


धान्याने कणगी भरलेली

दूध दुभतं , तूप दही असायचं

किडुक - मिडूक गहाण ठेवून

सावकाराची देणी फेडून काय उरायच ?


आता सारं काही बिघडलं

भुताचा नांगर गावावर

शिवार ओस पडली

शहराकडे लोकं निघाली


रक्ताळलेल्या पायानी तरी

कुठवर हिरवे स्वप्न पाहणार ?

कितीही पिकलं तरी कसं भागणार

कुठवर उधार उसनवारी करणार ?


पर्याय फक्त दोनच आहेत

मरत - मरत जगायचं की ?

शहराकडे जाऊन स्वाभिमान

गहाण ठेवून कसंतरी पोट भरायचं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy